ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सोमवार १० जानेवारी २०२२ पासून नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.
वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सोमवार १० जानेवारी २०२२ पासून नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.
New restrictions in maharashtra from 10 January 2022
new restrictions in maharashtra : महाराष्ट्रात १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू
new restrictions 21:25 ISTnew regulations in maharashtra from 10 January 2022 : वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सोमवार १० जानेवारी २०२२ पासून नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.
New regulations in maharashtra from 10 January 2022महाराष्ट्रात १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू
थोडं पण कामाचं
महाराष्ट्रात १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागूपहाटे पाच ते रात्री ११ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदीरात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी
new restrictions in maharashtra from 10 January 2022 : मुंबई : वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना संकटाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यात सोमवार १० जानेवारी २०२२ पासून नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.
बातमीची भावकी:
रावसाहेब दानवे यांच्यासह पाच केंद्रीय मंत्र्यांना कोरोना
Raosaheb Danave Corona Positive : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन
SSC & HSC Exam : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार; मंडळाकडून तयारी सुरू
SSC HSC pre examination : महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी बारावीची पूर्व परीक्षा
महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध
पहाटे पाच ते रात्री ११ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आस्थापनांनी 'वर्क फ्रॉम होम'वर भर द्यावा, अत्यावश्यक असल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे. कार्यालयात एकावेळी एकूण कर्मचाऱ्यांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीला बंदी ज्यांचे लसचे दोन डोस घेऊन झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी इतरांना कार्यालयात प्रवेशबंदी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजण्याचे आणि सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. कार्यालयात सॅनिटायझरची व्यवस्था ठेवण्याचे बंधन. लग्नासाठी जास्तीत जास्त ५० जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमाला जास्तीत जास्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहतील. प्रशासकीय काम, लसीकरण, ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये येणारे शिक्षक यांना प्रवेश मिळेल पण त्यासाठी त्यांना लसचे दोन डोस घेण्याचे बंधन लागू असेल. शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी सलून पुढील आदेशापर्यंत बंद केस कापण्याच्या सलूनमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी. सलून रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत बंद असेल. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच सलूनमध्ये प्रवेश. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आणि खेळाडूंचा सराव सुरू राहील. स्पर्धेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्स्पर्ट आदींना केंद्र सरकारच्या नियमांनुसार क्वारंटाइनच्या बंधनांचे पालन करावे लागेल. स्पर्धेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्स्पर्ट आदींना दर तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. इतर खेळांच्या स्पर्धांना आणि सरावाला बंदी. मनोरंजनाची उद्याने, प्राणीसंग्रहालये, अभयारण्ये, संग्रहालये, किल्ले, सर्व पर्यटनस्थळे आणि जिथे तिकीट काढून जावे लागते अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद मॉल, मार्केट येथे लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश. मॉल आणि मार्केट रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील. क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रेस्टॉरंट तसेच लहान-मोठी हॉटेल येथे क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. होम डीलिव्हरी सुरू राहील. नाट्यगृह आणि सिनेमागृह येथे क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच राष्ट्रीय पर्यटनासाठी परवानगी. ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असल्यास पर्यटनाला परवानगी. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच मालवाहतूक करण्यास परवानगी. सार्वजनिक वाहतूक सुरू. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्पर्धा परीक्षा आणि केंद्रीय संस्थांच्या अखत्यारितील परीक्षा होतील. तसेच राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्याच्या अखत्यारितील परीक्षा होतील. निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट, लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, शरीराचे सामान्य तापमान आणि योग्य तिकीट सोबत असल्यास रेल्वे, विमान, बसमधून प्रवासाकरिता परवानगी. अत्यावश्यक अधिकारी-कर्मचारी यांना लसचे दोन डोस घेतले असतील आणि शरीराचे सामान्य तापमान असेल तर कामासाठीच्या प्रवासाला परवानगी. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसचे दोन डोस आणि शरीराचे सामान्य तापमान ही दोन बंधने लागू असतील. उपस्थितीच्या मर्यादेचे आणि नियमांचे पालन करुन काम करता येईल. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार काही नवे निर्बंध लागू केल्यास त्यांचे संबंधित भागात पालन करण्याचे बंधन आहे.









No comments