२०३० पर्यंत क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य १०० पटीने वाढण्याचा अंदाज, गुंतवणुकदार मालामाल होण्याची चिन्हे
Cryptocurrency marketplace २०३० पर्यंत क्रिप्टोकरन्सीचे बाजारमूल्य १०० पटीने वाढण्याचा अंदाज, गुंतवणुकदार मालामाल होण्याची चिन्हे
Investment in Bitcoin : क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत कित्येक पट म्हणजे मल्टीबॅगर परतावा (Multibagger returns) दिला आहे. कोरोनामुळे जगभरातील शिखर बँकांनी भरपूर पैसे छापले आणि हे पैसे डिजिटल चलनात गुंतवले गेले. तथापि, यावर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरणदेखील झाली आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सी हा जगातील महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय (Investment choice)बनवण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.
Cryptocurrency Outlook: नवी दिल्ली : अलीकडच्या काही वर्षांपासून, क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) चर्चा सर्वत्र सुरू आहे. याचे कारण असे की याने गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांत कित्येक पट म्हणजे मल्टीबॅगर परतावा (Multibagger returns) दिला आहे. कोरोनामुळे जगभरातील शिखर बँकांनी भरपूर पैसे छापले आणि हे पैसे डिजिटल चलनात गुंतवले गेले. तथापि, यावर्षी क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरणदेखील झाली आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सी हा जगातील महत्त्वाचा गुंतवणूक पर्याय (Investment choice)बनवण्याचा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. (Cryptocurrency Marktet capital will rise by means of a hundred times, attain to 250 trillion dollar)
क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ २५० ट्रिलियन डॉलरची होणार
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात, रिअल व्हिजनचे सीईओ आणि गोल्डमन सॅक्सचे माजी कर्मचारी राऊल पॉल यांनी सांगितले की, २०३० पर्यंत क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजारभांडवल सध्याच्या तुलनेत १०० पटीने जास्त असेल. क्रिप्टोकरन्सीचे एकूण मार्केट कॅप सध्या २ ट्रिलियन डॉलरपेक्षा थोडे अधिक आहे. ते म्हणतात की २०३० पर्यंत ते २५० ट्रिलियन डॉलरच्या पुढे पोहोचेल. त्यानुसार, क्रिप्टोकरन्सी असा अॅसेट क्लास असेल ज्यामध्ये सर्वाधिक वाढ होईल. सध्या, जागतिक इक्विटी मार्केट, बाँड मार्केट, रिअल इस्टेटचे एकूण मार्केट कॅप सुमारे २५०-३५० ट्रिलियन डॉलर आहे. त्यावरून क्रिप्टोकरन्सीच्या विस्ताराचा अंदाज यावा.
३५० कोटींचा युजर बेस असणे आवश्यक
त्याच्या संभाव्यतेबद्दल बोलताना, पॉल म्हणाले की जर २०३० पर्यंत जागतिक क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकदारांची संख्या ३.५ अब्ज किंवा ३५० कोटींपर्यत पोहोचली तर मार्केट कॅप कोणत्याही परिस्थितीत २५० ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल. या शक्यतेबद्दल, जिओटस क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजचे सह-संस्थापक आणि सीईओ विक्रम सबुराज म्हणाले की, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा क्रिप्टोकरन्सीला जगातील सरकार आणि संस्था यांच्याकडून मान्यता मिळेल.









No comments